ही बातमी शेअर करा:

महाराष्ट्र दुष्काळ अखेर जाहीर करण्यात आला आहे.

सिन्नर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पावसाने मोठा खंड दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी ‘Trigger-1’ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून तातडीने मदत दिली जाणार आहे.

काय आहे Trigger-1?
जेव्हा सलग २१ दिवस पाऊस पडत नाही, तेव्हा हा Trigger लागू होतो. सध्या राज्यातील जवळपास दोन तृतीयांश जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे, त्यामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना काय मिळणार?
१. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची मदत थेट खात्यात जमा होणार.
२. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे, त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज मिळणार.
३. जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे रब्बी पिकासाठी सरकार मदत करणार.
४. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि अन्न सुरक्षेला प्राधान्य.

वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक सवलती मिळणार आहेत. यामध्ये विज बिलात सूट, शालेय फी मध्ये सूट, आणि रोहयो अंतर्गत कामे वाढवणे यांचा समावेश आहे. सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की महाराष्ट्र दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने मदत पोहोचवावी. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत