किनगाव राजा – किनगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांसमोर सध्या एक नवीन संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे रोही (निलगाय) चा उपद्रव.
गेल्या काही दिवसांपासून किनगाव राजा, जवळच्या शिवारात रोहीचे कळप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. रात्रीच्या वेळी हे कळप शेतात घुसून सोयाबीन, कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.
शेतकरी त्रस्त
एका शेतकऱ्याने बातमी कट्टा न्यूज ला सांगितले की, “एका रात्रीत 2 ते 3 एकरातील पीक रोही फस्त करून टाकतात. आम्ही रात्रभर राखण करूनही काही उपयोग होत नाही.”
वनविभागाने याकडे लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
उपाय काय?शेताच्या भोवती तारेचे कुंपण करणे.रात्रीच्या वेळी आवाज करणारे भोंगे लावणे.वनविभागाच्या मदतीने रोहीला जंगलात हाकलवणे.या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
