नागपूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या लाभार्थींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण आजपासून सुरू करण्यात आले आहे. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट 1500 रुपये जमा केले जात आहेत.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील जवळपास 2 कोटी 25 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
1500 रुपये जमा होण्यास सुरुवात –
टप्प्याटप्प्याने वितरणसरकारने स्पष्ट केले आहे की, सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत. हे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाईल. आजपासून पहिल्या टप्प्यातील वितरणाला सुरुवात झाली असून पुढील 3-4 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. महिलांनी आपले बँक खाते नियमितपणे तपासावे.
e-KYC केलेल्यांनाच मिळणार लाभ
सरकारने यापूर्वीच e-KYC बंधनकारक केले आहे. ज्या 24 लाख महिलांनी e-KYC करताना सरकारी नोकरी किंवा चुकीची माहिती भरली होती, त्यांना अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी केल्यानंतरच हप्ता मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे e-KYC पूर्ण आहे आणि कोणतीही चूक नाही, त्यांच्याच खात्यात आधी पैसे जमा होत आहेत.
बँक खाते तपासा आणि हे करा
तुमच्या बँकेत जाऊन किंवा UPI द्वारे बॅलन्स तपासा.
तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे,तरच मेसेज येईल.
जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका, तुमचा नंबर पुढील यादीत असू शकतो.
