मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1500 रुपये मिळवणाऱ्या लाखो महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
सरकारच्या e-KYC प्रक्रियेत एका चुकीच्या प्रश्नामुळे राज्यातील तब्बल 24 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या असून त्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत.
नेमकं काय झालं?
महिला व बालकल्याण विभागाने e-KYC करताना एक प्रश्न विचारला होता – “तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नाही ना?”
या प्रश्नात दुहेरी नकार (Double Negative) असल्यामुळे अनेक महिलांनी गोंधळून चुकून होय हा पर्याय निवडला. त्यामुळे सिस्टीमने आपोआप त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील असल्याचे दाखवून अपात्र ठरवले.
खरं तर महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी 8-9 लाखच आहेत, पण अपात्र 24 लाख महिला दाखवल्यामुळे अधिकाऱ्यांनाही शंका आली आणि मग ही चूक उघडकीस आली.
सरकारचा मोठा निर्णय – अंगणवाडी सेविका घरी येणार
या प्रकरणानंतर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी X वर माहिती दिली की, या 24 लाख महिलांची माहिती दुरुस्त करण्यासाठी जवळपास 1 लाख अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच अनेक ग्रामीण भागातील महिलांना आधार-बँक लिंकिंग आणि तांत्रिक अडचणींमुळेही पैसे मिळालेले नाहीत.
तुम्ही काय करावं?
जर तुमचा हप्ता 2-3 महिन्यांपासून आला नसेल तर तुमच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा.
तुमचे e-KYC पुन्हा एकदा तपासून घ्या.
बँक खाते आधारला लिंक आहे का ते NPCI वर चेक करा.
सरकारने स्पष्ट केलं आहे की पात्र महिलांची योजना बंद होणार नाही. चुका दुरुस्त झाल्यावर सर्वांचे पैसे पुन्हा सुरू होतील.
