बुलढाणा: जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होते, मात्र आजच्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
