ST Bus NCMC Card last date November 2026 QR code
ही बातमी शेअर करा:

MSRTC ST Bus NCMC Card बाबत प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड नोंदणीची मुदत नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत वाढवली आहे.

ST Bus NCMC Card Last Date काय आहे?

MSRTC ने दिलेल्या माहितीनुसार, सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांनी नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी आपले National Common Mobility Card (NCMC) काढून घेणे आवश्यक आहे. राज्यभरातील सर्व ST आगार, बसस्थानक आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू राहील.

महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणीची मुदत वाढवली

ST Bus NCMC Card:अनेक प्रवाशांनी तक्रार केली होती की नोंदणी केल्यानंतरही स्मार्ट कार्ड मिळण्यास 20-30 दिवस लागत आहेत. ही गैरसोय लक्षात घेता ST महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. नोंदणी केल्यानंतर मिळणारी QR कोड असलेली पावती 30 दिवसांपर्यंत वैध ग्राह्य धरली जाणार आहे.

तुम्ही बसमध्ये चढल्यावर कंडक्टरच्या ई-तिकीट मशीनवर हा QR कोड स्कॅन करून सवलतीचे तिकीट मिळवू शकता. या 30 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे प्रत्यक्ष NCMC स्मार्ट कार्ड घेऊन ते सक्रिय करणे बंधनकारक आहे.

ST NCMC Card कसे काढायचे?

ST NCMC Card काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या ST आगारात जावे लागेल. सोबत आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि 199 रुपये शुल्क घेऊन जावे. जर तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून तुम्हाला 149 रुपयात नवीन कार्ड मिळेल.

रिचार्ज कसा करायचा?

नवीन NCMC कार्डच्या मागे एक QR कोड दिला आहे. तुम्ही BHIM App किंवा इतर UPI App ने तो स्कॅन करून घरबसल्या कार्डमध्ये पैसे टाकू शकता. त्यामुळे तिकीट काढताना सुट्ट्या पैशांचा त्रास होणार नाही.

कोणत्या प्रवाशांना कार्ड अनिवार्य?

1 ऑक्टोबर 2026 पासून महिला सन्मान योजना अंतर्गत 50% सवलत आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील मोफत प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसेल तर तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागेल. असे Batmikatta News चे आवाहन आहे.

MSRTC च्या या निर्णयामुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. NCMC कार्ड एका टॅपवर पेमेंट होणार असून सुट्टे पैशांचा त्रास वाचणार आहे. लवकरच सर्व ई-बसमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमच्या बातमी कट्टा न्यूज ला भेट द्या