राज्य सरकारने अखेर खरीप 2026 चा दुष्काळाचा अधिकृत GR जाहीर केला आहे. 265 तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाला आहे. सह सचिव संजय इंगळे यांनी 26 सप्टेंबर रोजी 11:21 वाजता या GR वर डिजिटल स्वाक्षरी केली आहे. या यादीला सर्वजण maharashtra dushkal yadi 2026 म्हणून सर्च करत आहेत.
या GR नुसार शेतकऱ्यांना 12 मोठ्या सवलती मिळणार आहेत – जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज बिलात सूट, परीक्षा फी माफी, रोहयोची कामे आणि टँकर सुरू करणे.
संपूर्ण 265 तालुक्यांची यादी जिल्हानिहाय:
ठाणे विभाग:
रायगड (1): श्रीवर्धन
रत्नागिरी (3): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
सिंधुदुर्ग (8): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला
नाशिक विभाग:
नाशिक (10): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
धुळे (4): धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर
जळगाव (15): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदुरबार (6): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
अहिल्यानगर (14): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता
पुणे विभाग:
पुणे (8): भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
सोलापूर (11): उ. सोलापूर, द. सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
सांगली (4): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ
सातारा (6): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर
कोल्हापूर (6): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड
छ. संभाजीनगर विभाग (सगळ्यात जास्त):
छ. संभाजीनगर (9), जालना (8), बीड (11), लातूर (10), धाराशिव (8), नांदेड (14), परभणी (9), हिंगोली (5)
अमरावती विभाग:
बुलढाणा (13), अमरावती (14), अकोला (7), वाशिम (6), यवतमाळ (16)
नागपूर विभाग:
वर्धा (7), नागपूर (14), भंडारा (3), गोंदिया (1): तिरोडा, चंद्रपूर (12), गडचिरोली (2)
GR डाऊनलोड लिंक: maharashtra.gov.in – संकेतांक 202609261117494941
