देऊळगाव राजा हत्या प्रकरणाने बुलढाणा जिल्हा हादरला आहे. देऊळगाव राजा शहरामध्ये कवालीच्या कार्यक्रमात मुलांमध्ये किरकोळ भांडण सुरू झाले होते. या किरकोळ भांडणाचे रूपांतर सोमवारी रात्री मोठ्या संघर्षात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यासमोरच दोन्ही गट आमने सामने येऊन जोरदार संघर्ष सुरू झाला. या हाणामारीत शिवसेनेचे नगरसेवक शेख अनवर शेख अली तसेच आरिफ खान अरुण खान पठाण या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला झाला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांना तातडीने जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
देऊळगाव राजा हत्या च्या या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या रक्तरंजीत संघर्षामुळे देऊळगाव राजा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस ठाणेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
या देऊळगाव राजा हत्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
मुलांच्या किरकोळ भांडणाचे रूपांतर सशस्त्र हल्ल्यात झाल्यामुळे नगरसेवकाला आपला जीव गमावा लागल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
देऊळगाव राजा शहरातील या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलीस प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
