CJP Morcha 10 October 57 Metro Band
ही बातमी शेअर करा:

नवी दिल्ली,:CJP Morcha 10 October ला दिल्लीतील जंतर मंतर येथे होणार होता, पण दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. CJP ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित केला होता. मतदार यादीतील घोळ आणि ‘वोट चोरी’च्या आरोपावरून हा मोर्चा काढण्यात येणार होता.

यापूर्वीही दिल्लीत INDIA आघाडीने जंतर मंतरवर मोर्चा काढला होता

CJP Morcha 10 October: 57 मेट्रो स्टेशन बंद का?

दिल्ली पोलिसांच्या संयुक्त आयुक्त नुपूर प्रसाद यांनी सांगितले की, CJP चे सह-संयोजक सौरभ दास यांनी 7 ऑक्टोबर रोजीच परवानगीसाठी अर्ज केला होता. नियमानुसार जंतर मंतरवर कोणताही मोठा मोर्चा काढण्यासाठी किमान 10 दिवस आधी अर्ज करणे बंधनकारक आहे. तसेच गर्दीचा अंदाज, मार्ग आणि स्वयंसेवकांची माहिती देणे आवश्यक असते. या सर्व नियमांचे पालन न केल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली जिल्ह्यात सध्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून कोणीही जंतर मंतरवर जमल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ला पत्र लिहिले आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील 57 मेट्रो स्टेशनचे प्रवेश आणि निर्गमन द्वार बंद ठेवण्याची आणि ट्रेनची वारंवारता कमी करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा बंद 9 ऑक्टोबर रात्री 9 वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.

ज्या 57 स्टेशनमध्ये बंद राहणार आहेत त्यात राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटेरिएट, पटेल चौक, जनपथ, मंडी हाऊस, ITO, सुप्रीम कोर्ट, काश्मिरी गेट, करोल बाग, लाजपत नगर, हौज खास, जामिया मिलिया इस्लामिया, सीलमपूर अशा महत्वाच्या स्टेशनचा समावेश आहे.

या निर्णयामुळे दिल्लीकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. याआधी INDIA आघाडीच्या मोर्चा दरम्यान दिल्लीत दोन दिवस दारू दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता CJP मोर्चामुळे मेट्रो सेवा विस्कळीत होणार आहे.

दुसरीकडे CJP ने मात्र मोर्चा होणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. संघटनेने म्हटले आहे की, दिल्ली पोलीस जिथे अडवतील तिथेच आमचे जंतर मंतर असेल. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने होईल आणि तरुणांच्या नेतृत्वाखाली होईल.

अधिक माहितीसाठी Citizens for Justice and Peace (Wikipedia) बद्दल वाचा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत