Dubai Gold Road: दुबई म्हटलं की आलिशान गोष्टी आल्याच. बुर्ज खलिफा, पाम जुमेराह नंतर आता दुबई आणखी एक अजूबा जगासमोर आणत आहे. दुबईमध्ये चक्क सोन्याचा रस्ता बनवला जात आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. अनेकांना वाटतंय ही अफवा आहे, पण ही बातमी 100% खरी आहे.
काय आहे नक्की प्रकल्प?
दुबईच्या प्रसिद्ध Gold District (देईरा) मध्ये जगातील सर्वात लांब आणि पहिला 24 कॅरेट सोन्याचा वॉकवे (Gold Walkway) बनवला जात आहे. हा काही गाड्या चालणारा मोठा रस्ता नाही, तर पर्यटकांना चालण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी बनवलेला एक खास मार्ग असणार आहे. याला ‘Gold Street’ असेही म्हटले जात आहे.
Dubai Gold Road: दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टचे सिनियर डायरेक्टर रशीद अल हरमौदी यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वॉकवेचे काम वेगात सुरू असून पुढील 2 महिन्यात म्हणजेच 2026 च्या अखेरपर्यंत हा वॉकवे सर्वांसाठी खुला केला जाणार आहे. हा वॉकवे जगातला पहिलाच आणि सर्वात लांब असेल असा दावा प्रशासनाने केला आहे.
Dubai Gold Road का बनवत आहेत सोन्याचा रस्ता?
दुबई हे जगातील सोन्याच्या व्यापाराचे सर्वात मोठे केंद्र आहे. आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये एकट्या UAE ने 53 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सोन्याची निर्यात केली आहे. स्वित्झर्लंड, इंग्लंड, भारत आणि हॉंगकॉंग हे त्यांचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दुबईला सोन्याचे शहर म्हणून जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट जानेवारी 2026 मध्ये अधिकृतपणे सुरू झाला असून येथे सध्या 1000 पेक्षा जास्त सोने, दागिने, परफ्युम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्सची दुकाने आहेत. मालाबार गोल्ड, तनिष्क, जोयालुक्कास सारख्या मोठ्या ब्रँड्सनी येथे आपली मोठी शोरूम उघडली आहेत. 2026 च्या सुरुवातीपासून येथील घाऊक सोन्याच्या व्यापारात 20% वाढ झाली आहे. या वॉकवेमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी 10 ते 20 टक्क्यांनी वाढेल असा विश्वास प्रशासनाला आहे.
संपूर्ण रस्ता सोन्याचा असेल का?
याबाबत अजून पूर्ण तांत्रिक माहिती समोर आलेली नाही. वॉकवेमध्ये 24 कॅरेट सोने वापरण्यात येणार आहे हे नक्की आहे, पण सोन्याचा थर कसा असेल, किती किलो सोने लागणार आणि त्याची सुरक्षा कशी असणार याबद्दलची माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच दुबईने जगातील सर्वात वजनदार सोन्याच्या झुमक्यांचा (Earings) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, त्याच कार्यक्रमात या गोल्ड वॉकवेची घोषणा करण्यात आली होती.
एक मात्र नक्की, दुबईचा हा सोन्याचा रस्ता जगभरात चर्चेचा विषय ठरणार असून भारतातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण असणार आहे.
अशाच नवनवीन आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी आमच्या बातमी कट्टा न्यूज ला भेट देत रहा.
