बुलढाणा:Buldhana Pani Tanchai News बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची भीती असून, याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.
काय आहेत महत्त्वाचे निर्णय?
- Buldhana Pani Tanchai News – अवैध पाणी उपशावर बंदी :जिल्ह्यात अवैध पाणी उपशावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. कोणी बेकायदेशीररित्या पाणी उपसा करत असल्याचे आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
- 11 महिन्यांचा आराखडा: ऑक्टोबर 2026 ते ऑगस्ट 2027 या 11 महिन्यांसाठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
- धरणांच्या गाळात चारा: खडकपूर्णा आणि पेनटाकळी धरणाच्या परिसरात पडलेल्या गाळात चारा पिकवण्याची योजना राबवली जाणार आहे, जेणेकरून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल.
जिल्हाधिकारी म्हणाले, “उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा. सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.”
अधिक बातम्या वाचा: बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पाणीटंचाई अपडेट्स आणि जिल्ह्याच्या बातम्यांसाठी बातमी कट्टा न्यूज ला अवश्य भेट द्या.
