शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5000 रुपये जमा होणार असल्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या बळीराजासाठी दिवाळीच्या तोंडावर हा अत्यंत दिलासादायक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5000 रुपयांची आगाऊ मदत थेट DBT द्वारे जमा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5000 रुपये – 305 तालुक्यांना लाभ
सरकारने दुष्काळाची व्याप्ती वाढवली आहे. आधीच्या यादीत 40 नवीन तालुक्यांचा समावेश करून आता एकूण 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या सर्व 305 तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन, कापूस आणि तूर पीक करपून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते.
या मदतीची अधिक माहिती तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
पैसे जमा होण्यासाठी eKYC गरजेचे
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5000 रुपये ही मदत आगाऊ स्वरूपात असेल. पंचनाम्याची वाट न पाहता पैसे जमा होतील. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पात्र याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच टँकर आणि चारा छावण्या वाढवण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार लिंक आणि फार्मर आयडीचे eKYC पूर्ण ठेवावे. यापूर्वी जाहीर झालेली कर्जमाफी तिसरी यादी बद्दल आम्ही सविस्तर बातमी दिलेली आहे ती ही आपण पाहून आपले नाव आहे की नाही ते पहावे.
