ही बातमी शेअर करा:

नवीन रेशन कार्ड कसे काढायचे 2026 – संपूर्ण माहिती महाराष्ट्रात 2026 मध्ये नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. जर का तुमच्या कुटुंबात नवीन सदस्य आला असेल, लग्न झाले असेल किंवा तुम्ही विभक्त झाला असाल, तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढावे लागते. आज आपण Mahafood च्या नवीन नियमानुसार रेशन कार्ड कसे काढायचे ते Step by Step पाहणार आहे.

रेशन कार्डचे प्रकार कोणते आहेत?

अर्ज करण्याआधी तुम्हाला कोणते कार्ड पाहिजे हे माहित असणे गरजेचे आहे.

1. APL (केशरी कार्ड): ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी

2. BPL (पिवळे कार्ड): दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी.

3. अंत्योदय (AAY): अत्यंत गरीब कुटुंबासाठी.यामध्ये सर्वात जास्त धान्य मिळते.

नवीन रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे 2026

अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे जवळ ठेवा:

1.कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड

2.रहिवासी पुरावा (लाईट बिल / मतदान कार्ड)

3.उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराचा)

4.मोबाईल नंबर (आधार लिंक असलेला)

5.पासपोर्ट साईज फोटो

6.विवाहित असेल तर विवाह प्रमाणपत्र

नवीन रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज कसा करावा?

राज्य सरकारने mahafood.gov.in ही अधिकृत वेबसाईट दिली आहे. तिथून तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.

Step 1: सर्वात आधी mahafood.gov.in या साईटवर जा.

Step 2: “नवीन रेशन कार्डसाठी अर्ज” या पर्यायावर क्लिक करा.

Step 3: तुमचा आधार नंबर टाकून OTP ने लॉगिन करा.

Step 4: आता फॉर्म उघडेल, त्यात कुटुंब प्रमुखाचे नाव, पत्ता, सदस्यांची माहिती अचूक भरा.

Step 5: सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा (PDF 200KB पेक्षा कमी असावी).

Step 6: फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, तो जपून ठेवा.

साधारण 15 ते 21 दिवसात तुमचा अर्ज तहसील कार्यालयात तपासला जातो आणि तुमचे रेशन कार्ड तयार होते.

ऑफलाईन अर्ज कुठे करावा?

ज्यांना ऑनलाईन जमत नसेल त्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जावे. तिथे 50 रुपयांमध्ये फॉर्म मिळतो. फॉर्म भरून कागदपत्रे जोडून तिथेच जमा करावा लागतो.

रेशन कार्ड स्टेटस कसे चेक करावे?

अर्ज केल्यानंतर mahafood.gov.in वर जाऊन “Know Your Ration Card Status” मध्ये तुमचा अर्ज क्रमांक टाका, तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.

मित्रांनो, रेशन कार्ड हे फक्त धान्यासाठी नाही तर अनेक सरकारी योजनांसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे वरील माहिती वापरून लवकरात लवकर अर्ज करा. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी batmikattanews.com ला भेट देत रहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत