रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल कंपनी Jio Platforms चा बहुप्रतिक्षित IPO अखेर येत आहे. कंपनीने आपला प्राईस बँड आणि तारखा जाहीर केल्या आहेत.
मुख्य मुद्दे:
Jio Platforms च्या IPO Jio ने आपल्या 27 कोटी शेअर्स विक्रीसाठी काढले आहेत. एका शेअरची किंमत 1,065 रुपयांपासून 1,119 रुपयांपर्यंत असणार आहे. यातून कंपनी जवळपास 30,213 कोटी रुपये उभारणार आहे. हा आकडा Hyundai Motor India च्या 27,870 कोटींच्या रेकॉर्डपेक्षा जास्त आहे, म्हणजेच हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरणार आहे.
सामान्य गुंतवणूकदाराला किती पैसे लागतील?
तुम्हाला कमीत कमी 12 शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागेल. म्हणजे तुमच्या खिशातून कमीत कमी 13,428 रुपये जाणार. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक शेअरवर 54 रुपये सूट जाहीर केली आहे.
कधी आहे IPO?
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली उद्या, म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. तर सामान्य लोकांसाठी हा IPO 21 ऑक्टोबरला उघडेल आणि 23 ऑक्टोबरला बंद होईल.
फायदा होणार का?
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, Jio चा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सध्या 218 रुपयांच्या आसपास आहे, म्हणजेच लिस्टिंगच्या दिवशी 19% नफा मिळू शकतो. रिलायन्सचे शेअर आधीच या बातमीने 3% ने वाढले आहेत.
रिलायन्सच्या सध्याच्या भागधारकांसाठी कंपनीने 2,500 कोटींचा वेगळा कोटा ठेवला आहे, त्यामुळे तुमच्याकडे रिलायन्सचा एक जरी शेअर असेल तर तुम्हाला जास्त चान्स आहे.
आमच्या अधिकच्या बातम्या वाचण्यासाठी batmikatta news वर क्लिक करा.
