यकृत निरोगी ठेवण्यासाठी फळे (yakrut nirogi thevanyasathi fale) अत्यंत गुणकारी आहेत. यकृत (Liver) हा शरीराचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्तातील विषारी घटक स्वच्छ करणे, ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करणे आणि प्रथिने तयार करणे अशी अनेक महत्त्वाची कार्ये करतो. यकृतामध्ये बिघाड झाल्यास अन्नाचे पचन आणि पोषक घटक साठवण्याची प्रक्रिया ठप्प होऊ शकते, म्हणून आहारात योग्य फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.
म्हणूनच यकृत निरोगी राखण्यासाठी काही खास फळांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. यकृत निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण कोणती फळं खावीत.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी फळे(yakrut nirogi thevanyasathi fale)
पपई : पपई यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे यकृताच्या (लिवर) सेल्सची सूज कमी करण्यास मदत करतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.
द्राक्षे : द्राक्षे यकृताच्या काही एन्झाईम्सला गती देण्यास आणि त्याचे कार्य सुधारण्यास मदत करतात. द्राक्षांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट यकृताच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे यकृतातील सूज रोखण्यास मदत होते.
अंजीर : अंजीरमध्ये असलेले काही आहारातील तंतू यकृताचे नुकसान टाळण्यास मदत करतात. यासोबतच अंजीरमध्ये उच्च प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असतात, जे फॅटी लिव्हरच्या समस्येपासून संरक्षण करण्यासाठी देखील काम करतात.
सफरचंद : आपण आहारात सफरचंदाचाही समावेश करू शकता. हे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. एवढेच नाही तर सफरचंदात असलेले पॉलिफेनॉल यकृतातील सीरम आणि लिपिड पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात.
केळी : केळी यकृत मजबूत करण्याचे काम करते. तसेच फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते. केळी खाल्ल्याने यकृत चांगले काम करते. त्यामुळे यकृत सुधारण्यासाठी तुम्ही केळी देखील खाऊ शकता.
तसेच फॅटी लिव्हरची लक्षणे आणि घरगुती उपाय वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी फळांसोबतच नियमित व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे देखील गरजेचे आहे. ही 5 फळे रोज सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी खाल्ल्यास यकृताचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र कोणताही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
द्राक्षांप्रमाणेच रोजच्या आहारात कोणती फळं खावीत याबद्दल आम्ही सविस्तर माहिती बातमी कट्टा न्यूज वर दिली आहे. तसेच नवीन रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या साईटला भेट द्या.
यकृताच्या आरोग्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही Wikipedia वरील माहिती वाचू शकता.
