देशातील सर्वात मोठ्या शेअर बाजाराची म्हणजेच NSE (National Stock Exchange) ची 10 वर्षांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे.NSE चा IPO उद्या 24 सप्टेंबर 2026 रोजी BSE वर लिस्ट होणार आहे. हा देशातील दुसरा सर्वात मोठा IPO ठरला आहे.
NSE IPO ची ठळक वैशिष्ट्ये:
लिस्टिंग तारीख: 24 सप्टेंबर 2026 (गुरुवार), फक्त BSE वर
प्राईस बँड: ₹1700 ते ₹1785 प्रति शेअर
इश्यू साईज: ₹22,569 कोटी
लॉट साईज: 8 शेअर्स (किमान गुंतवणूक ₹14,280)
सबस्क्रिप्शन: IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 5.71 पट सबस्क्राईब झाला आहे. QIB ने 12.68 पट, तर रिटेलने 1.39 पट अर्ज केले.
GMP काय सांगतो?
आज ग्रे मार्केटमध्ये NSE चा GMP ₹43 ते ₹55 च्या आसपास आहे. म्हणजे ₹1785 च्या वर ₹1828 ते ₹1840 वर लिस्टिंग होण्याची शक्यता आहे, म्हणजे सुमारे 2.5% ते 3% लिस्टिंग गेन मिळू शकतो.
कंपनीबद्दल:
NSE चा हा पूर्णपणे OFS (Offer for Sale) आहे. यात LIC, SBI, Goldman Sachs सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी आपला हिस्सा विकला आहे. कंपनीला या IPO मधून एक रुपयाही मिळणार नाही.
तज्ञांच्या मते, NSE चा कॅश मार्केटमध्ये 93% मार्केट शेअर आहे, त्यामुळे लॉन्ग टर्मसाठी हा एक मजबूत शेअर मानला जात आहे.
Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही.
